Ahilyanagar News : राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी नगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सुचवलेल्या सर्व विकासकामांना मंजुरी देत मोठा निधी दिला. आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
या निवडणुकीत महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे खूप सहकार्य होत आहे. नगर शहरातील गोरगरीब कुटुंबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्कृष्ट काम चालू आहे. या मदत कार्यातून गोरगरिब जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत. हे काम असेच अखंडितपणे चालू ठेवा असे आवाहन माजी आमदार अरुण जगताप यांनी केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात अरुण जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मदत कक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी अरुण जगताप यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख रणजितसिंह परदेशी, जिल्हा समन्वयक संदीप सप्रे, जिल्हाप्रमुख मंगेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख काका शेळके, ओंकार शिंदे, अंबादास कराळे, शहरप्रमुख रोहित लोखंडे, विपुल शेटीया, डॉ. विजय भंडारी व शहरातील सर्व उपशहर प्रमुख, समन्वयक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्यसेवा ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.. संग्राम जगतापांच्या कल्पकतेनं बदलंतय नगरचं रुप..
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने नगर शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्व पदाधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. याबद्दल वैद्यकीय पक्षाचे कौतुक. विधानसभा निवडणुकीसाठी आता थोडे दिवस बाकी आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचार करून आ.जगतापांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा संपर्कप्रमुख रणजीतसिंह परदेशी यांनी वैद्यकीय कक्षाची माहिती देताना पक्षाचे काम कशा प्रकारे चालते व नगर शहर व सर्व तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांचे हॉस्पिटलची बिलं कक्षाच्या माध्यमातून कमी करून रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
केडगावला चांगला दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील, संग्राम जगतापांची केडगावकरांना ग्वाही