केडगावला चांगला दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील, संग्राम जगतापांची केडगावकरांना ग्वाही
Sangram Jagtap : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात (Ahmednagar City Assembly Constituency) देखील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap) जोरदार प्रचार करताना दिसत आहे. त्यांनी केडगाव (Kedgaon) उपनगराला भेट देत नागरिकांशी संवाद साधत आतापर्यंत नगर शहर आणि केडगाव उपनगराच्या विकासासाठी काय केलं याची माहिती दिली.
यावेळी संग्राम जगताप म्हणाले की, प्रभाग क्रमांक 17 मध्ये रेणुका मातेकडून आशीर्वाद घेऊन प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. केडगाव नगरचा एक उपनगर आहे आणि त्यामुळे केडगाव उपनगराला चांगला दर्जा मिळवण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत. असं संग्राम जगताप म्हणाले.
रेल्वे ब्रीचपासून देवी मंदिरापर्यंत कॉंक्रीट रस्ता काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आला आहे. अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुने दगडी पूल काढून नवीन आरसीसी पूल निर्माण केला आहे. तसेच या परिसरात चांगले रस्ते आणि ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. असं संग्राम जगताप म्हणाले.
तर येणाऱ्या काळात देखील केडगाव परिसरात अनेक विकासाच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नागरिकांशी बोलताना संग्राम जगताप यांनी दिली. तसेच पुन्हा एकदा विकासकामांची जबाबदारी आमच्यावर टाकण्यासाठी आणि नगर शहराच्या विकासासाठी येत्या 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबा असं आवाहन देखील त्यांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचार फेरीच्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना केला.
Chandrakant Kulkarni : 21 नोव्हेंबर रोजी चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार …, ‘मनोमंच’ ते ‘रंगमंच’..
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
डॉ. अतुलबाबा भोसलेंसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, शुक्रवारी मलकापुरात घेणार जाहीर सभा