अहमदनगरमध्ये घुमणार बच्चू कडूंचा आवाज, प्रहारचा दोन जागांवर शड्डू; कोणाचं गणित बिघडणार?

अहमदनगरमध्ये घुमणार बच्चू कडूंचा आवाज, प्रहारचा दोन जागांवर शड्डू; कोणाचं गणित बिघडणार?

Prahar party Bacchu Kadu will contest in Nevasa and Parner : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि पारनेर (Nevasa and Parner) मतदारसंघात बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) प्रहार पक्षाचे (Prahar party) उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. परिवर्तन महाशक्तीने या जागा प्रहार पक्षासाठी सोडल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी ( स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केलीय. या आघाडीला त्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ असं नाव दिलंय.

Video: अजित पवारांनी कठीण काळात विश्वास ठेवला; राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दीकी भावूक

पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांना तिकीट देण्यात आलंय. आता बच्चू कडू पारनेरमधून कोणत्या शिलेदाराला रिंगणात उतरवात हे पाहणं (Maharashtra Assembly Election 2024) महत्वाचं ठरेल. नेवासा मतदारसंघातील उमेदवाराची देखील अजून घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर बच्चू कडूंनी एकला चलो रे ची भूमिका घेत परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना केलीय.

Sunil Tingre : अखेर सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीक काय करणार याची उत्सुकता

परिवर्तन महाशक्तीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. परिवर्तन महाशक्तीची उमेदवारांची पहिली यादी
जाहीर झालीय. या यादीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या चार उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. अचलपूर मतदारसंघातून ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू, रावेर यावल मतदारसंघात अनिल छबिलदास चौधरी, चांदवडमधून गणेश रमेश निंबाळकर, देगलूर बिलोली मतदारसंघात सुभाष साबणे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे.

आता परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांची दुसरी यादी केव्हा येणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या यादीत नगरमधील पारनेर आणि नेवासा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तिसऱ्या आघाडीच्या प्रवेशानंतर आता निकालावर काय परिणाम होतो? परिवर्तन महाशक्तीच्या स्थापनेची घोषणा करताना संभाजी राजे छत्रपती म्हणाले होते की, ‘निवडणुकीत कोणाचा तरी पराभव निश्चित करण्यापेक्षा आपण उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागावे, जेणेकरून विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न उचलता येतील.’

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube