Download App

“आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा”, सुजय विखेंचा निलेश लंकेंना खोचक टोला

येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावला.

Sujay Vikhe on Nilesh Lanke : माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आज खासदार निलेश लंके यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा आणि या निवडणुकीचा अविश्वसनीय निकाल अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची जनता देईल असा विश्वास माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. सुजय विखे आज नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नगर शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विकास आघाडी (Sujay Vikhe) तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले, आज स्थानिक विकास आघाडी निर्माण करणारे श्रीगोंद्यात जाऊन विकास आघाडी. यांची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की हे ह्यांच्या पक्षाचं चिन्ह घ्यायला सुद्धा घाबरत आहेत. ही परिस्थिती आम्ही यांची करून ठेवली आहे. तरीसुद्धा आघाडी निर्माण करून कोणतं जरी चिन्ह घेतलं तरी निकाल बदलत नाही. अहिल्यानगरच्या जनतेनं मागच्या एक वर्षात जे सहन केलं जनतेला देखील कळालं आहे की आता काही उपयोग नाही. महायुती बरोबर राहिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट दिसेल.

“फास्ट गाडीचाही अपघात होतो, क्रेडिट घ्यायचंच असेल तर..”, थोरातांनी सुजय विखेंना कोणता सल्ला दिला?

लोकं म्हणतात आमची चूक झाली

मला आनंद इतकाच आहे की जेव्हा लोक मतदान टाकून एखाद्या निवडून दिलेल्या खासदाराच्या कार्यपद्धतीनंतर मी आज वर्षानंतर परत आल्यानंतर लोकं जेव्हा मला भेटतात तेव्हा लोकांचं एकच वाक्य असतं की आमची फार मोठी चूक झाली याच्याइतका आनंद मला कोणताच होत नाही. आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा आणि या निवडणुकीचा अविश्वसनीय निकाल अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाची जनता देईल असा विश्वास माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.

आता नगरच्या रेल्वे स्टेशनचही नाव बदललं

जसं आपण जिल्ह्याचं नाव बदललं त्याच पद्धतीने आज रेल्वे स्टेशनचंही नाव बदललं आहे. आता नगरचं रेल्वे स्टेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. त्यांच्या नावाला शोभेल असेच या रेल्वे स्टेशनचे विकास आपण करत आहोत. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून नगरच्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध करून आधीचं नाव बदलून आता नगरच्या रेल्वे स्टेशनचं नाव अहिल्यानगर रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे.

Ahilyanagar Railway Station : आता रेल्वे स्थानकाचे नावही अहिल्यानगर 

follow us