Ahilyanagar News : केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली व आता हे महाविद्यालय कोठे उभारण्यात येणार यावरून आता राजकारण पेटणार असे चित्र सध्या निर्माण झालेआहे. या मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणतायत. तसेच हे कॉलेज नगर शहराच्या जवळपासच झाले पाहिजे असाही त्यांचा आग्रह आहे.
मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हे कॉलेज जिल्ह्यातील उत्तरेकडे म्हणजेच शिर्डीकडे घेऊ जाऊ इच्छित आहे असा दावा लंकेकडून केला जातोय. यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विखे-लंके संघर्षाच्या वादाला आता मेडिकल कॉलजेची किनार मिळतेय कि काय व येणाऱ्या काळात हाच मुद्दा संघर्षाचा ठरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान विखे-लंके यांच्यामध्ये होणाऱ्या वादाची कारणे आपण या जाणून घेऊ…
केंद्र सरकारने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय जर अहिल्यानगर शहरामध्ये झाले नाही तर आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान मंजूर झालेले मेडिकल कॉलेज शिर्डी या ठिकाणी होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी एक प्रकारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे.
तसेच लंके यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देखील दिले आहे. तसेच आजवर अनेक खासदार याठिकाणाहून झाले मात्र आजवर कोणीही मेडिकल कॉलेजची मागणी केली नाही. आपण खासदार होताच आपण याची मागणी देखील केली व पाठपुरावा देखील केला व ते मंजूर झाले. अशा शब्दात एकप्रकारे लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून निलेश लंके हे मैदानात उतरले. सहज असलेली हि निवडणूक लंकेच्या एन्ट्रीने विखेंसाठी अडचणीची झाली. या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच लंकेंनी जोरदार आघाडी घेतली. मंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांच्यासाठी देखील हि निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली गेली. मात्र लंके यांनी या निवडणुकीमध्ये सुजय यांचा पराभव करत विखे कुटुंबाला जोरदार धक्का दिला. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये लंके यांच्या मदतीसाठी विखे यांचे राजकीय शत्रू बाळासाहेब थोरात यांनी लंके यांना पाठबळ दिले होते. व याच लोकसभा निवडणुकीपासून लंके विरुद्ध विखे अशा संघर्षाला सुरुवात झाली.
भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन
अहिल्यानगर जिल्हा हा सर्वाधिक भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी असो अथवा पोलीस अधीक्षक असो यांना काम करण्यासाठी वेळ असा पुरत नाही व त्यामुळे कामाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या नियोजनासाठी जर आपल्याला जिल्हा विभाजन झाले तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत मोठा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा विभाजन व्हावे हि अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र हा मुद्दा अनेक वर्षांपासुन प्रलंबितच आहे.
जिल्हा विभाजन झालेच पाहिजे अशी मागणी आजवर अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे आता त्याच बरोबर खासदार निलेश लंके देखील यासाठी आग्रही आहे. तर जिल्हा विभाजनाची आवश्यकता नाही असे माजी खासदार सुजय विखे यांनी म्हंटले होते. तसेच हा शासन स्तरावर होणार निर्णय म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील हा विषयाला टाळले. दक्षिणेच्या विकासासाठी जिल्हा विभाजन झाले पाहिजे अशी आग्रही मागणी लंके यांची आहे. मात्र याला विरोध असल्याने जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावरून देखील लंके व विखेंमध्ये मतभेद आहे. व आगामी काळात या मुद्द्यावरून देखील दोघांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
अहिल्यानगर जिल्हा दोन गटात विभागाला गेला असून जिल्ह्यातील उत्तर भाग हा अत्यंत सधन आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील दक्षिण भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. शासनाच्या विविध मोठं मोठे कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये म्हणजेच प्रामुख्याने शिर्डी या ठिकाणी करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये विमानसेवा सुरु करण्यात आलेली असल्याने आजवर अनेक वरिष्ठ नेते केंद्रीय नेते हे याठिकाणी येऊन गेले आहे.
जरांगे… जीभेला लगाम दे! तुझ्या पोसणाऱ्याला आम्ही… गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
साहजिकच जिल्ह्यातील या दोन भागांची तुलना केली असता उत्तर भाग हा वरचढ ठरू लागला. यातच शिर्डी म्हणजे मंत्री विखे यांचे होम ग्राउंड असल्याने सत्तेच्या जोरावर हे सगळं होत असल्याचे देखील विरोधकांनी वारंवार बोलवून दाखवले. यामुळे जिल्ह्यात उत्तर भाग हा वरचढ ठरत असून दक्षिण हा वंचितच रहातोय अशी परिस्थिती दिसतेय.
दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून विखे व लंके यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. टीका टिपण्णीच्या माध्यमातून दोघांमध्ये शाब्दिक वार हे सुरूच आहे. मात्र आता या वादाला मेडिकल कॉलजेच्या माध्यमातून नव्याने सुरुवात होण्याची परिस्थिती निर्माण झालेय. कॉलेज नेमकं कोठे होणार व विखे – लंके संघर्ष पुन्हा पेटणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.