Download App

नगरकरांनो लक्ष द्या, ‘या’ दिवशी शहरातील पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल

Ahilyanagar News : महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल, अशी माहिती अहिल्यानगर महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महावितरण प्रशासनाकडून विद्युत तारांवर आलेल्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यासाठी व इतर विद्युत कामांसाठी एक दिवसाचा शटडाऊन शनिवारी (ता. १५) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. याच कालावधीत महापालिकेकडून शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामे करण्यात येतील. त्यामुळे या कालावधीत मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या रात्रीपासून 22 तास ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

शनिवारी (ता. १५) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर आदी भागाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागाला पाणी पुरवठा रविवारी (ता. १६) होईल.

रविवारी (ता. १६) शहरातील सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता व सावेडी या भागांना पाणी पुरवठा होणार नाही. त्या ऐवजी या भागाला सोमवारी (ता. १७) पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

पाणीपट्टीत दुप्पटवाढ! आधी नियमित पाणीपुरवठा करा…दरवाढीवरून भाजप आक्रमक

follow us