Download App

प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता…

अहिल्यानगर ते पुणे थेट 125 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिलीयं.

Ahmednagar News : अहिल्यानगरमधून पुण्याला रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, कारण अहिल्यानगर ते पुणे थेट 125 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला (Ahilyanagar-pune railway Survey) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता मिळाल्याची माहिती खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिलीयं. रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा प्रश्न लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लावून धरला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने दखल घेत अखेर सर्वेक्षणाला मान्यता दिलीयं.

सुनील गावस्करांना पाहताच नीतीशचे वडील भावूक, थेट पायांवर टेकवलं डोकं; व्हिडिओ पाहाच…

अहिल्यानगरसह आजूबाजूच्या परिसरातील तरुण, सरकारी कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थ्यांसह महिला मोठ्या संख्येने व्यवसाय आणि शिक्षणासाठी जात येत असतात. या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करीत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भभवतात. या समस्या सोडवण्यासाठी नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत निलेश लंके यांनी आवाज उठवला होता.

नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू झाल्यास निःसंशयपणे दोन्ही शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या विविध श्रेणीतील प्रवशांना फायदा होईल. याशिवाय माल वाहतूक, बोगी वाहतुकीच्या उद्देशाने रेल्वेला जोडल्यास त्यातून रेल्वेस उत्पन्न मिळले. कारण नगर आणि परिसरातील अनेक व्यापारी पुण्यातून माल खरेदी करतात आणि त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. त्यामुळे नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन ट्रायल आणि रन तत्वावर सुरू करण्यात यावी अशी मागणी खासदार लंके यांनी संसदेमध्ये केली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका

पुणे ते अहिल्यानगर 125 किलोमीटरचा दुहेरी ट्रॅक आणि शिर्डी ते पुणतांबा असा 17 किलोमीटर नव्या दुहेरी ट्र्रॅकच्या प्रकल्पांसाठी सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहिती रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांचा शेतीमाल फळभाज्या, भाजीपाला कृषी उत्पन्न समितीत दाखल झाल्यानंतर हा माल रस्त्याच्या मार्गाने पुणे आणि मुंबईत दाखल होतो. अनेकदा रस्त्यामध्ये वाहतूकीची कोंडी असल्याने हा माल पोहोचवण्यात अधिकचा वेळ लागत असतो, पण थेट रेल्वे मार्ग झाल्यास बाजार समितीतील शेतमाल थेट मुंबई पुण्याच्या बाजारपेठेत जाणे शक्य होणार आहे.

धार्मिक अन् औद्योगिक कनेक्टिव्हीटी वाढणार – खासदार निलेश लंके
अहिल्यानगर ते पुणे रेल्वेमार्ग झाल्यास धार्मिक आणि औद्योगिक कनेक्टिव्हीटी वाढणार असून या रेल्वेमार्गावरच अनेक तीर्थस्थळे आणि औद्योगिक वसाहीत आहेत. त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळणार असून फायदा होणार असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

follow us