अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले ! अशोक गायकवाड यांचे निधन

Ashok Gaikwad: विद्यार्थी दशेपासून ते आंबेडकरी चळवळीत ते आले होते. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक मात्र अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती.

Ashok Gaikwad

Ashok Gaikwad

Ashok Gaikwad passed away : अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांचे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या दुपारी १२ वाजता नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शनिवारी ते श्रीरामपूरमध्ये पक्षाच्या कामासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना नगरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यात त्यांचे निधन झाले आहे.

विद्यार्थी दशेपासून ते आंबेडकरी चळवळीत ते आले होते. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक मात्र अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. ते जिल्हा परिषद सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते. रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये ते अनेक वर्षे होते. अशोक गायकवाड सुरवातीला रिपब्लिकन पक्षात होते. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे हे नीकटवर्तीय मानले जात होते. मात्र, आंदोलने आणि काही ध्येयधोरणांवरून त्यांच्यात मतभेद झाले. ते रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव होते. परंतु मतभेदामुळे अशोक गायकवाड यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

मधल्या काळात त्यांनी स्वतंत्र पक्ष संघटना उभी केली. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होते. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे ते समर्थक होते. त्यानंतर आलेल्या निवडणुकांसाठी ते इच्छूक होते. मात्र उमेदवारी मिळत नव्हती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Exit mobile version