अहिल्यानगर पोलीस दलाची मान उंचावली..! राजू सुद्रिक यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान..

Ahilyanagar police-पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक (Raju Sudrik) यांना महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.​

Raju Sudrik

Raju Sudrik

अहिल्यानगर : पोलीस दलात प्रामाणिक सेवा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानाचा गौरव होणे हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असतो. असाच एक सुवर्णक्षण अहिल्यानगर पोलीस दलाने (Ahilyanagar Police) अनुभवला आहे. आपल्या 15 वर्षांच्या अविरत आणि निष्कलंक सेवेचे फळ म्हणून पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक (Raju Sudrik) यांना महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.​ जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe) आणि नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा दिमाखात पार पडला.

महासंचालक कार्यालयाकडून सन 2025 या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह नुकतेच घोषित करण्यात आले होते. राज्यभरातील आठशे निवडक अधिकारी आणि अंमलदारांच्या यादीत राजू सुद्रिक यांनी आपल्या कर्तृत्वाने स्थान मिळविले आहे.​ गेल्या 15 वर्षांपासून सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या आहेत. त्यांचा सेवा काळ हा कोणत्याही डागाविना आणि अत्यंत शिस्तबद्ध राहिला आहे, ज्याची दखल थेट राज्य स्तरावरून घेण्यात आली. गुन्हे तपासात मदत असो वा कायदा-सुव्यवस्था राखणे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

सुद्रिक हे सध्या एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे एमआयडीसी.पोलीस ठाणेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. ​सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणारे हवालदार म्हणून राजू सुद्रिक यांची ओळख आहे. त्यांना हा मानाचा ‘DG मेडल’ मिळाल्याबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि अहिल्यानगरच्या नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version