Download App

आषाढी वारीनिमित्तानं अहमदनगर पोलिसांकडून वाहतूक बदल; वाचा, कोणते आहेत नवे मार्ग?

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Ashadhi Wari : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा (Pandharpur) विचारता करत नगर-मनमाड रस्त्यावरील जडवाहतूक इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे. (Ashadhi Wari) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा हा आदेश आज रविवार (दि. 30 जून) पासून (दि. ९ जुलै)च्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

वाहतूक कुणीकडे? मोठी बातमी! खून प्रकरणात शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

या आदेशानुसार नगरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक विळद बाह्यवळण- शेंडी बाह्यवळण- नेवासा- कायगाव- गंगापूर मार्गे मनमाडला किंवा केडगाव बाह्यवळण- कल्याण बाह्यवळण- आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे वळविण्यात आली आहे. तसंच, शनिशिंगणापूर वरून राहुरी मार्गे मनमाडकडे जाणारी वाहने नगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जातील. राहुरी कृषी विद्यापीठाकडून मनमाडकडे जाणारी जडवाहने श्रीरामपूर- बाभळेश्वर- निर्मळ पिंपरी बाह्यवळण मार्गे कोपरगाव, येवला मार्गे जातील.

मनमाडकडून नगरकडे मनोज जरांगेंचा मोर्चा खराडीत, पुणे-नगर वाहतुकीत मोठे बदल

मनमाडकडून नगरकडे जाणारी वाहनं पुणतांबा- वैजापूर- गंगापूर- कायगाव- नेवासा- शेंडी बाह्यवळण- विळद बाह्यवळण- केडगाव बाह्यवळण मार्गे जातील. बाभळेश्वरकडून नगरकडे जाणारी जडवाहने बाभळेश्वर- श्रीरामपूर- टाकळीभान- नेवासा मार्गे नगरकडे जातील.

मनमाडकडून मुंबई, पुणे, कल्याण

मनमाडकडून मुंबई, पुणे अथवा कल्याणकडे जाणारी जडवाहनं पुणतांबा फाटा- झगडे फाटा- सिन्नर- नांदूर शिंगोटे- संगमनेर- आळेफाटा मार्गे जातील, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज