Download App

तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हाच टायगर करणार, सुजय विखेंचा थोरातांना इशारा

तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हा टायगरच करेल, असा इशारा सुजय विखेंनी (Sujay Vikhe) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat यांना दिला.

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe : कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe) बोललं तर याद राखा, तिथचं गाडेल. जी आग माझ्या गाडीला लावली, ती आग तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. जे तलवार, कोयते माझ्यासाठी आले होते, ते तुमच्या मुलांच्या गळ्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही, तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हा टायगरच करेल, असा इशारा सुजय विखेंनी (Sujay Vikhe) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दिला. आज ते अंबोऱ्यात बोलत होते.

Sixth candidate list of MNS: मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई, ठाण्यातही दिले ‘तगडे’ उमेदवार 

वसंत देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध...

संजय विखेंचा आज अंबोरा गावात परिवर्तन मेळावा झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, धांदरफळमध्ये झालेल्या घटनेचा आज मी निषेध व्यक्त करतो. माझ्या व्यासपीठावर जे वक्तव्य झालं, ते कुठल्याही संस्कृतीला शोभणारं नाही. जे कोणी माता बहिणींचं चरित्र हनन करतील, त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. ज्याच्या घरात आया-बहिणी आहेत, ते असं सहन करणार नाहीत. मी मान्य करतो, माझ्या व्यासपीठावर 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चारित्र्य हनन करणारं वक्तव्य केलं हे निंदणीय आहे. माझ्या व्यासपीठावर झालेल्या या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. माझ्या परिवाराच्या वतीन दिलगिरी व्यक्त करतो.

आमदाराचे कार्यकर्ते महिलांशी चुकीचं वागले…
पुढं ते म्हणाले, आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे. त्या व्यक्तीने जे वक्तव्य केलं, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझ्या सभेनंतर ज्या आदिवासाी आणि मागासवर्गीय महिला घरी परतत होत्या, त्यांना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या थांबवून वळून काढलं. त्यांचे हात ओढले, मंगळसुत्र ओढलं, तुमच्यात दानत असेल तर माफी मागा, माझं खुलं आव्हान आहे, असं विखे म्हणाले.

देशमुखांच्या विरोधात वकिलीही मीच देणार…
वसंत देशमुखांना अटक करून तुमच्या मुलीला न्याय मिळाला, तोच न्याय आमच्या आदिवासी महिलांना मिळणार का? असा सवाल करत वसंत देशमुखांच्या विरोधात वकिलही आता मीच देणार कारण, मी अशाचं समर्थन करू शकत नाही, असं विखे म्हणाले.

तर याद राखा तिथचं गाडेल
यावेळी सुजय विखेंनी जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांचे काही व्हिडिओ दाखवले. या व्हिडिओत बाळासाहेब थोरात व्यासपीठावर असतांना काही नेत्यांनी सुजय विखे, राधाकृष्ण विखेंबद्दल घाणेरडी वक्तव्य केली. त्यावर बोलतांना सुजय म्हणाले, या लोकांनी माझ्या वडिलांचं हनन केलं. त्यांच्यावर आरोप केले. मी आजवर सर्व सहन केलं. एकही सभा उधळून लावली नाही. एकालाही हात लावला नाही. आमच्या रक्तात दहशत नाहीत.आम्ही गाडी सोडा सायकलही जाळली नाही. पण, आमची सहनशीलता आमची कुमजोरी समजू नका. आजपासून मी आचारसंहिता मी मोडत आहे. कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखेंवर बोललं तर याद राखा तिथचं गाडेल, असा इशारा सुजय विखेंनी दिला.

ते म्हणाले, सभा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तीनशे लोक जमा होतात. त्यांना मला मारायचंच होतं. मला किंवा माझ्या गोरगरिब कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर स्वत:ला नुसतं टायगर म्हणणार नाही, हा टायगर वारही करेल. या बिबट्यांचा बंदोबस्त टायगरच करेल. जी आग माझ्या गाडीला लावली, ती आग तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. जे तलवार, कोयते माझ्यासाठी आले होते, ते तुमच्या मुलांच्या गळ्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही सुजय विखेंनी दिला.

 

follow us