Download App

अजितदादा गटाच्या बॅनरवर शरद पवारांऐवजी ‘या’ नेत्याचा फोटो; मंत्री धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

Ajitdada Groups Banner On Yashwantrao Chavan : राष्ट्रवादीच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar)यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)यांचा फोटो झळकवण्यात आला, यावर विचारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत आहे या दैवतानेच माझा फोटो लावू नये नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याऐवजी, ते ज्यांना गुरु मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला आहे, असे म्हणत मंत्री मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले.

ठाण्यात माफी, नांदेडमध्ये शिक्षा : डॉ. वाकोडेंची जात पाहून त्यांना घरी बसवलं; आव्हाडांचा हल्लाबोल

नगर शहरात 15 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध संस्थापक सुनील गोसावी, राजेंद्र उदागे, अरुण जगताप, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीतील चिन्हाच्या वादावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘कोणाकडे लोकशाही आहे हे…’

कार्यक्रमाच्या नंतर मंत्री धंनजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बॅनर वर शरद पवार यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला असा प्रश्न मंत्री मुंडे यांना करण्यात आला.

यावर मंत्री मुंडे म्हणाले, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आला, यावर विचारल्यानंतर मंत्री मुंडे म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत आहे या दैवतानेच माझा फोटो लावू नये नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ येऊ नये, म्हणून आम्ही त्याच्या ऐवजी ते ज्यांना गुरु मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावला असे ते म्हणाले.

दरम्यान अजित पवार यांनी बंडाची ठिणगी पाडत आमदारांचा एक मोठा गट सोबत घेतला. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. कोणत्याही कार्यक्रमासाठी यापुढे अजित पवार गटाने शरद पवार यांचा फोटो लावू नये असे परखड वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. तसेच आपला फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला होता.

Tags

follow us