राष्ट्रवादीतील चिन्हाच्या वादावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘कोणाकडे लोकशाही आहे हे…’

राष्ट्रवादीतील चिन्हाच्या वादावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘कोणाकडे लोकशाही आहे हे…’

Dhananjay Munde on Sharad Pawar : निवडणूक आयोगात काल झालेल्या युक्तीवादात अजित पवार गटाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. यावर विचारल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की निवडणूक आयोगात झाले यात नवीन काही नाही. हा वाद अगोदरच निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. कुणाच्या बाजूने लोकशाही जास्त आहे हे निवडणूक आयोग ठरवेल आणि विचार करून निर्णय देईल असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा काल युक्तीवाद पूर्ण झाला आहे. या युक्तीवादात अजित पवार गटाने धक्कादायक आरोप शरद पवार यांच्यावर केले आहेत. शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. त्यांची अध्यक्षपदाची निवड ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या नियुक्त्या देखील बेकायदा आहेत. असा युक्तीवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.

फडणवीसांचा राऊतांवर पलटवार, ‘त्यांचाच पक्षात मदारी अन् बंदर…’

कांद्याला 2710 रुपये भाव मिळाला तो ऐतिहासिक भाव होता. काल प्रधान सचिव आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे बैठक घेतली. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत सुद्धा बैठक झाली आहे. 29 तारखेला गोयल यांनी दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 650 मे टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला. तो निर्णय देखील विषय ऐतिहासिक आहे. एवढे होऊन देखील फक्त विरोधाला विरोधच होत चाललेला आहे. यामध्ये राजकारण करून आपली न्यूज सेल्स व्हॅल्यू वाढून घ्यायची असा काहींचा उद्योग सुरू आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Chhagan Bhujbal : ..तरच अजितदादा CM होतील; भुजबळांनी सांगितलं आमदारांच्या संख्येचं गणित

नांदेड येथील झालेल्या घटना संदर्भामध्ये तानाजी सावंत यांनी ही काही माझी एकट्याची जबाबदारी नाही, असं वक्तव्य केले होते. यावर धनंजय मुंडे म्हणाले की ते काय बोलले हे मला माहित नाही निश्चितपणे त्याची माहिती घेऊन मी या विषयावर बोलेल असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube