फडणवीसांचा राऊतांवर पलटवार, ‘त्यांचाच पक्षात मदारी अन् बंदर…’

फडणवीसांचा राऊतांवर पलटवार, ‘त्यांचाच पक्षात मदारी अन् बंदर…’

Devendra Fadnavis on Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मदारी आहेत. ते डमरु वाजवतात आणि हे दोन माकडे नाचतात, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.त्यांच्या पार्टीत कोण मदारी आहे आणि कोण बंदर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले की संजय राऊत हे त्यांच्या पार्टीबद्दल सांगत असतील. त्यांच्या पार्टीत कोण मदारी आहे आणि कोण बंदर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. कारण मी प्रतिक्रिया द्यावी एवढे संजय राऊत मोठे नाहीत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे कसली शिवसेना. शिंदेंची शिवसेना म्हणजे चायना माल आहे. त्यांची शिवसेना मेड इन चायना आहे. कारण त्यांचे सरकारच दिल्लीने बनवले आहे. त्यांचे जे सरकार आहे, ते ईडी, सीबीआयने बनवले आहे. एकनाथ शिंदेंना ईडी, सीबीआयने फोडले आहेत. परंतु त्यांच्या हातात काही नाही. फडणवीस डमरू वाजवतात आणि ते नाचत असल्याची खोचक टीका संजय राऊतांनी केली होती.

Chhagan Bhujbal : ..तरच अजितदादा CM होतील; भुजबळांनी सांगितलं आमदारांच्या संख्येचं गणित

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, त्यांच तिथंच भविष्य चांगलं आहे. महाराष्ट्रात शिंदे राहतील, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी म्हटले होते. यावर मिश्किलपणे फडणवीस म्हणाले की त्यांच्या शुभेच्छा मला मान्य आहेत.

Chhota Rajan Gang Member Arrest : छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

दोन देशातील नक्षलवाद संपवला जाईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही जिल्ह्यामधील नक्षलवादावर नियंत्रण मिळवले आहे. विशेषत: पाच सहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात नक्षलवादाचा सामना केला आहे, एकप्रकारे आपण त्यांना उधवस्त केले आहे. पुढील दोन वर्षात अॅक्शन प्लान बनवलेला आहे. यातून नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालं पाहिजे. मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. जे येत नाहीत त्यांचा खात्मा झाला पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून योग्य ती कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube