Chhota Rajan Gang Member Arrest : छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड गॅगस्टर छोटा राजनच्या (Chhota Rajan) टोळीतील एका सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. साकीर बरकत अली लखानी (Sakir Barkat Ali Lakhani) असं अटक केल्याला गुंडाचं नाव आहे. 29 वर्षांपूर्वी सशस्त्र दरोड्याच्या घटनेत सहभागी असल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींवर मुंबई आणि गुजरातमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत.
Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1994 मध्ये आरोपी साकीर बरकत अली लखानी (59) आणि त्याच्या छोटा राजन टोळीतील चार साथीदारांनी चेंबूरच्या सिंधी कॅम्पमध्ये एका इस्टेट एजंटचे दुकान घातक शस्त्रांशी दरोडा टाकाला होता. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावरही त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी गुन्हे शाखेने भादंवि कलम 399, 307, 353, 402 आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 नुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी प्रकरणी लखानीला अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपींचे अन्य तीन साथीदार पोलिसांच्या चकमकीत मारले गेल्यानंतर लखानी फरार झाला होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीनं पोलिसांनी तपास केला असता आरोपी गुजरातमधील सुरत येथे लपून बसल्याचे निष्पन्न झालं. कक्ष 5 च्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुजरातला जाऊन पाहणी केली असता आरोपी ओळख लपवून राहत असल्याचं समजलं. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं.
लखानी विरोधात मुंबई आणि गुजरातमध्ये दरोडा, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी आणि फसवणुकीचे असे एकूण 10 गुन्हे नोंद आहेत. तसेच गुजरात येथील ओधव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हा दाखल असून त्याची फरार आरोपी म्हणून नोंद आहे. आरोपी त्यावेळी अॅन्टॉपहिल परिसरात राहत होता.