Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?

Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?

Prasad Oak: मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) हा सध्याच्या घडीच मराठी मनोरंजनसृष्टीतील (Entertainment) आघाडीचं नाव आहे. त्याने अभिनायच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. तसेच (Social media) अभिनयासोबतच तो आता उत्कृष्ट दिग्दर्शक देखील झाला आहे. असा हा आघाडीचा अभिनेता गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. तसेच काही चाहत्यांनी त्याच्या एका कृतीने प्रसादला आश्चर्याचा धक्का दिल्याचे बघायला मिळाले आहे. याचा अनुभव त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर करत सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)


आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप vanity van मधे आला आणि म्हणाला… “ दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना ५ मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकानी मला फेटा बांधला… दुसऱ्यानी गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्यानी म्हणजे नवनाथ नी… ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले…

मी म्हणालो “ एवढ्याच साठी आला होतात..???” त्यावर ते म्हणाले “ हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले… मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं??? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं…??? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे… पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे… अशा वेळी कुठं चुकलो तर??? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो…???

या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्ती कडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मधले आमच्या संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले… संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!

Tiger 3 Trailer: ‘या’ दिवशी येणार भाईजानचा बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने सोशल मीडिया पोस्ट करत असताना दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत विठुराय दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रसाद हा विठुरायची मूर्ती हातामध्ये घेतल्याचे बघायला मिळाले आहेत. यावेळी प्रसादच्या डोक्यावर फेटा आणि गळ्यामध्ये हार दिसत आहे. हे फोटो शेअर करत असताना चाहत्यांसोबत तो अनुभव शेअर केला आहे. सध्या प्रसाद ओक हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित असलेल्या ‘महापरिनिर्वाण’ या मराठी सिनेमाच्या चित्रीकरण व्यस्त असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच तो स्वप्नील जोशीसोबत ‘जिलबी’ या सिनेमात दिसणार आहे. शिवाय त्याचा ‘वडापाव’ मराठी सिनेमा देखील चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube