Tiger 3 Trailer: ‘या’ दिवशी येणार भाईजानचा बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर

Tiger 3 Trailer: ‘या’ दिवशी येणार भाईजानचा बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर

Tiger 3 Trailer: सध्या बॉलीवूड (Bollywood) किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालला आहे. चाहत्यांना ‘जवान’सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. अनेक वेगवगळे रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या सिनेमाने निर्माण केले आहे. अशातच आता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)


गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर ३’च्या (Tiger 3) टीझरविषयी जोरदार चर्चा रंगत होती. नुकतंच यश चोप्रा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यश राज फिल्म्सनी त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा सिनेमा ‘टायगर ३’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत ‘भाईजानचा एक मेसेज’ आपल्याला बघायला मिळाला आणि त्यासोबतच भाईजानचा एक हटका अंदाज देखील बघायला मिळाला आहे. ‘टायगर ३’ या सिनेमाच्या प्रोमोला भाईजानच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. तेव्हापासून या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत होते.

परंतु आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. नुकतंच ‘यश राज फिल्म्स’नी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘टायगर ३’चं एक नवं पोस्टर शेयर करत सिनेमाच्या ट्रेलरची देट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये भाईजानच्या हातात बंदूक घेऊन सावधपणे उभा असलेल्या लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषौ बनला आहे. या पोस्टमध्ये सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाची डेट देखील जाहीर करण्यात आली. येत्या १६ ऑक्टोबर दिवशी ‘टायगर ३’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भाईजानचे चाहते यांनी आत्तापासूनच काऊंटडाउन सुरू केलं आहे.

नागराज मंजुळेचा दिवाळीत धमाका! ‘नाळ 2’ येणार; सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा

अद्याप भाईजान आणि कतरिना यांचा ‘टायगर ३’मधील हटके अंदाज पाहून चाहते देखील खुश झाल्याचे बघायला मिळत आहे. अद्याप सिनेमातील मुख्य व्हिलन इम्रान हाशमीच्या लुकची सर्वजणच आतुरतेने वाट बघत आहे. ‘टायगर ३’ हा ‘एक था टायगर’ सीरिजमधील पुढचा म्हणजेच तिसरा भाग असणार आहे. याचा सीक्वल म्हणजेच ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘टायगर ३’ आता यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा पुढचा भाग असणार आहे. येत्या दिवाळीमध्ये म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ दिवशी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube