अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी…

अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या सुरु असलेले दिवस म्हणजे मान्सून काळ अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा आज दुपारच्या सुमारास नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात जवळपास एक तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. […]

Rrr

Rrr

अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या सुरु असलेले दिवस म्हणजे मान्सून काळ अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा

आज दुपारच्या सुमारास नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात जवळपास एक तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वरसह ब्राम्हणगाव आणि इतर परिसरांत सुसाट वादळी वारा सुटला असून विजेचा कडकडाट सुरु आहे.

Nana Patole : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली, भाजपाचा पराभव करण्यासाठी काँगेसचा प्लॅन B तयार

तसेच बागलाण पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटन स्थळ असलेला साल्हेर किल्ला परिसरात ततानी, केळझर , पायरपाडा, महादर घाटंबा , साल्हेरवाडी या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय.

तसेच अहमदनगर शहरांत पावसाने तुफान बॅटींग केलीय. दोन्ही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावल्याचं दिसतंय. दोन दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर दोन दिवसांनंतर पाऊस आल्याने काही काळासाठी नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

Exit mobile version