Download App

अमित ठाकरे नगर दक्षिण लोकसभा लढवणार? मनसेनं आवळला सूर

Ahmednagar : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections)सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेची (Nagar Dakshin Lok Sabha)जागा चांगलीच चर्चेत आहे. या जागेसाठी भाजप(BJP), राष्ट्रवादी ही प्रबळ पक्षाचे उमेदवार चर्चेत असताना आता मनसेने (MNS)देखील या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवावी अशी मागणी मनसे नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांनी केली आहे. दरम्यान नगर दक्षिणमधून अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहेत. आता यामध्ये मनसे देखील उतरल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

भ्रष्टाचार करून भाजपात या, मंत्रीपदं मिळतील ही तर मोदींची गॅरंटी; ठाकरेंची सडकून टीका

याबद्दल भुतारे म्हणाले की, दक्षिण लोकसभा मतदार संघ हा अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे. अमित ठाकरे यांनी ही लोकसभा निवडणूक लढवली तर ते नक्कीच निवडून येतील. तसेच राज ठाकरे यांची विकासाची दूरदृष्टी लक्षात घेता संपूर्ण दक्षिण लोकसभा मतदार संघातील मतदार भरघोस मते ही मनसेच्या पारड्यात टाकतील. त्यामुळे जिल्ह्यात मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढेल.

पूजेचा अधिकार मिळताच हिंदू दलाने मशीद शब्द हटवला, Gyanvapi Masjid च्या बोर्डावर मंदीर शब्दाचं पोस्टर

अहमदनगर जिल्हा हा सहकार साखरसम्राटांचा आहे. अनेक दिग्गज नेते येथे होऊन गेले आहेत. परंतु म्हणावा तसा विकास या जिल्ह्याचा झालेला दिसत नाही. त्यामुळे अमित ठाकरेंनी येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदार संघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून मनसे जिल्हा सचिव जिल्ह्याचे नेते नितीन भुतारे यांनी मागणी केली आहे.

दरम्यान येत्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच आता मनसेने देखील लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. मनसेचे भुतारे यांनी याबाबत राज ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

राज ठाकरे तसेच अमित ठाकरे काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अमित ठाकरे यांच्यासारखा तरुण नेता दक्षिण लोकसभेत उतरला तर तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि विकासाची गंगा नगरमधून वाहील असेही यावेळी भुतारे यांनी सांगितले.

follow us