Pramod Kamble : सध्या देशात क्रिकेटचे (Cricket)महायुद्ध रंगले आहे. क्रिकेट वर्ल्डकप (World Cup 2023)सुरु आहे. यातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Sachin Tendulkar Statue)अनावरण आज बुधवारी (दि. 1) वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेंतर्गत वानखेडे स्टेडियमवर उद्या 2 नोव्हेंबरला भारताचा श्रीलंकेविरुद्ध सामना होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी पुतळा अनावरणाचा हा सोहळा होणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे (Ahmednagar)प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble)यांनी बनविला आहे.
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीला बोलावलं का? देसाईंनी स्पष्टच सांगितलं
नगरच्या शिल्पकाराने साकारला सचिनचा पुतळा
क्रिकेट विश्वातील एक नावाजलेले व मोठे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर होय. यातच अहमदनगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे सचिनचा पुतळा हा नगर जिल्ह्यात साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम जगविख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पूर्ण केले आहे. पुतळ्याचे काम करताना अनेक बारीक गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हा पुतळा आपल्या अहमदनगर येथील कार्यशाळेत बनवण्यात आला आहे. यासाठी जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लागला.
#WATCH | Maharashtra | Painter-sculptor from Ahmednagar, Pramod Kamble has been working on the statue of Cricket legend Sachin Tendulkar. The statue will be installed by the Mumbai Cricket Association (MCA) at Wankhede Stadium, as a tribute to Tendulkar who turned 50 earlier this… pic.twitter.com/nMpdI1vZ0C
— ANI (@ANI) October 22, 2023
पुतळ्याच्या अनावरणाला यांची विशेष उपस्थिती
वानखेडे स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.
दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय
सचिनच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये
सचिनच्या मुख्य मूर्तीची उंची 10 फूट असून त्याच्या हातात चार फुटाची बॅट असणार आहे. अशी पुतळ्याची एकूण उंची 14 फुटांची आहे. पुतळ्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. म्हणजेच हा पुतळा बॉलवर उभा असणार आहे. त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनच्या विक्रमांच्या नोंदी असणार आहेत. त्यामध्ये त्याच्या एकदिवसीय, कसोटी आणि मुंबईकडून खेळतानाची कामगिरी नमूद केलेली आहे. त्यात इतरही विक्रमांचा समावेश आहे. सचिनचा पुतळा हा कांस्याचा बनवण्यात आला असून पुतळ्याखालील चेंडूही कांस्याचा बनवण्यात आला आहे.