Download App

नगर-आष्टी रेल्वेला भीषण आग !

Ahmednagar Ashti Railway : नगर (Ahmednagar)आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-आष्टी रेल्वेला (Ahmednagar Ashti Railway)भीषण आग लागली. सोलापूर रोडवरील नगर तालुक्यातील वाळूंज बायपास गावाजवळ ही घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सहा डब्यांना अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता

मिळालेली माहिती अशी की, ही रेल्वे न्यू आष्टी रेल्वे स्टेशनकडून नगरकडे येत होती. अचानक रेल्वेच्या एका डब्ब्याला आग लागली. त्यानंतर आग वाढत गेली.रेल्वेच्या सहा डब्यांना भीषण आग लागली. या गाडीमध्ये पाच ते सहाच प्रवासी होते.ते सुरक्षितपणे बाहेर पडले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझवण्यासाठी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी शंकर मिसाळ यांनी दिली.

Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’

ही आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही. आग आणि धूराचे लोट पाहून परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. आगीमध्ये रेल्वेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्याप सुरु आहे.

रेल्वेला आग लागताच प्रवाशांना तात्काळ सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. अद्यापही आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. सध्यातरी रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग वाढत असल्याचेच दिसत आहे.

अनेक वर्षांपासून अहमदनगर ते आष्टी रेल्वे सुरु करण्याची मागणी केली जात होती. ही रेल्वे सुरु झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र दहा महिन्यांमध्ये या रेल्वेकडं प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही दिवस ही रेल्वे पुन्हा बंद करण्याची वेळ देखील ओढवली.

मोठ्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर ते आष्टी रेल्वे सुरू झाल्याने बीडकरांसह नगरकरांनी मोठा आनंद साजरा केला. मात्र आता देखील प्रवाशांनी पाठ फिरवल्याचेच पाहायला मिळाले. रेल्वेमध्ये अवघे काही प्रवाशी असल्याने त्यांना तात्काळ बाहेर काढून जिवीतहाणी टाळली.

गेल्या वर्षभरापासून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर ते आष्टीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा ही दि.23 सप्टेंबर 2022 पासून नियमित सुरू झाली आहे. ही रेल्वे अहमदनगरवरून सकाळी 7.45 वाजता निघते व न्यू आष्टी येथे 10.15 वाजता पोहोचते. त्यानंतर न्यू आष्टीवरुन ही रेल्वे 11 वाजता निघून दुपारी 2 वाजता अहमदनगर येथे पोहचते.

आज सोमवारी (दि.16) अहमदनगर येथूनच सकाळी 10.30 वाजता रेल्वेगाडी सुटल्याने रुटीनप्रमाणे न येता रेल्वे लेट झाली. ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथे जाताना दुपारी 3.30 वाजता नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर-सोलापूर मार्गावरील गेट क्रॉस करताना अचानचक पुढील चार-पाच डब्यांना आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

Tags

follow us