Nilesh Lanke : …म्हणून निलेश लंके अजित पवारांच्या एवढे जवळचे, लंकेंनी सांगितलं कारण

Nilesh Lanke : …म्हणून निलेश लंके अजित पवारांच्या एवढे जवळचे, लंकेंनी सांगितलं कारण

Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या घरी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार येऊन गेले. ते आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या एवढे जवळचे का? आहेत याचं खास उत्तर दिलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

लंके अजित पवार यांच्या एवढे जवळचे का?

लंकेंना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही अशी काय जादू करता? की, पवार कुटुंबातील शरद पवार, सुप्रीया सुळे आणि अजित पवार तिघेही तुमच्या घरी येतात तुमच्या कुटुंबीयांची भेट घेतात. त्यावर लंके म्हणाले की, मी सर्वसमान्य आहे पण माझी एक सवय आहे. मी ज्यच्यावर प्रेम करतो. त्याच्यावर निः स्वार्थीपणे प्रेम करतो.

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता

तसेच पुढे ते म्हणाले की, नेत्यांना देखील माहित आहे की, मी कधीच काही स्वतः साठी नाही तर जनतेसाठी मागितलेलं आहे. त्यामुळे आपल्या कामाची पावती नेते मंडळी देत असतात. कारण त्यांनाही माहिती असतं आपला कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो. त्यामुळेच आपण पवार यांच्या जवळचे असल्याचे यावेळी लंके यांनी सांगितले. त्याचबरोबर यावेळी लंके यांनी विखे यांच्यावर देखील टीका केली आहे.

पुण्यातील ‘त्या’ जमिन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, रोहित पवारांचं अजितदादांना खुलं आव्हान

दरम्यान आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर लंके कुटुंबाने देखील यावेळी अजित पवार यांचं स्वागत करत आदरातिथ्य केलं. तर अजित पवारांच्या लंकेच्या घरी जाण्याने लंकेंच्या आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार का? या चर्चांना देखील उधान आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube