Download App

श्रीगोंद्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ! दक्षिण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाटा

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. महाविकास आघाडीचे मात्र अजूनही तळ्यातमळ्यात सुरू आहे. अशातच आता या मतदारसंघाती श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. अजितदादांचे खंदे समर्थक बाळासाहेब नाहाटा यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाहाटा यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कपिल पवार आदी उपस्थित होते.

Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच’तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यानंतर अजित पवार गटाकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती दिली आहे.

याजागी आता बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नाहाटा यांच्या नियुक्तीचे पत्र काढले आहे. त्यानंतर आज नाहाटा यांना नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आले. यावेळी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आगामी काळात लोकसभा निवडणुका आहेत. त्यापाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बाळासाहेब नाहाटा यांच्या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे.

अजितदादांचा नगरसाठी नवा प्लॅन! शरद पवार गटाने डावललेल्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना मानाचं पान

 

follow us

वेब स्टोरीज