Ahmednagar BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. त्यात अहमदनगर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते ॲड.अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Ahmednagar BJP Abhay Aagarkar, Dilip Bhalsing and Viththlrao Langhe announce by Chandrashekhar Bavankule )
अखेर धीरज घाटेंचा वनवास संपला; प्रस्थापितांना डावलत मिळाली नवी जबाबदारी
नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग तर उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी व जिल्ह्यामध्ये पक्षांच्या बळकटीकरणासाठी वरिष्ठ पातळीवरून काही निर्णय घेतले जात आहे. याच निर्णयाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने राज्यात संघटनात्मक फेरबदलांना सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे भाजपने अनेक जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. यासाठ नगर शहर जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते ॲड.अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग तर उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत.
दरम्यान अभय आगरकर यापूर्वी शहराध्यक्ष होते. 2014 ला ते भाजपकडून विधानसभा लढले होते. जुन्या नेत्यावर पुन्हा विश्वास दाखविले आहे. विठ्ठलराव लंघे हे जुने भाजप कार्यकर्ते आहे. ते काही काळ राष्ट्रवादीत राहिले आहेत. पुन्हा भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर थेट उत्तरचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. नेवासा मतदारसंघात ते आता शंकरराव गडाख यांच्या विरोधात दावेदार असणार आहे.
त्यामुळे बाळासाहेब मुरकुटे यांची कोंडी झाली आहे. तर दक्षिण भागात पंकजा मुंडे समर्थक अरुण मुंडे यांचे जिल्हाध्यक्ष पद गेले आहेत. त्यांच्या ऐवजी नगर तालुक्यातील दिलीप भालसिंग यांची नियुक्ती झाली. भालसिंग हे कर्डिलेंचे समर्थक आहेत. ते वाळकीचे आहेत. हा भाग श्रीगोंदा मतदारसंघात येतो. या मतदार कर्डिले हे तयारी करत आहेत. त्यातून कर्डिले यांनी भालसिंग यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. भाजपने एकंदरीत भाकरी फिरवत जुन्या निष्ठावंतावर विश्वास टाकला आहे.