Download App

Sujay Vikhe : नगर जिल्हा विभाजन होणार का? खा. विखेंनी स्पष्टच सांगितलं

Sujay Vikhe : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला नगर जिल्ह्याचे विभाजन केले जावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु झाले आहे. यापूर्वी देखील श्रीरामपूरमध्ये अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय कार्यरत आहे. यापूर्वी एसटी महामंडळाचा डेपो श्रीरामपूरला कार्यरत होता. यामुळे जिल्ह्याची जस जशी वाढ होऊ लागली आहे त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळाव्यात तसेच गोष्टी सोईस्कर व्हाव्यात या दृष्टिकोनातून शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु झाले आहे. मात्र यामुळे नगर जिल्हा विभाजन होईल असे काहीच नाही, असे स्पष्ट मत खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केले.

नगर शहरात शनिवारी महसूल भवनाच्या इमारतीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे हे देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विखे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना जिल्हा विभाजनावर प्रश्न विचारण्यात आला.

जरांगेंच्या दबावाला सरकार बळी पडल्यास पाचपट मोठी सभा घेऊ; नागपूरात ओबीसी नेता आक्रमक

विखे म्हणाले, शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले आहे. यापूर्वी देखील श्रीरामपूरमध्ये अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय कार्यरत आहे. यापूर्वी एसटी महामंडळाचा डेपो श्रीरामपूरला कार्यरत होता. यामुळे जिल्ह्याची जशी वाढ होऊ लागली आहे त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळाव्यात तसेच गोष्टी सोईस्कर व्हाव्यात या दृष्टिकोनातून शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे शिर्डी येथे सुरू झाले म्हणजे जिल्हा विभाजन होईल असे नाही असे देखील यावेळी बोलताना खासदार विखे यांनी स्पष्ट केले.

शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय का सुरू केले, विखेंनी दिले उत्तर

जसे गृह विभागात दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक असे पद तयार होतात तसेच महसूलमध्ये देखील दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी असे पद तयार व्हावे यासाठी दृष्टिकोनातून शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुजय विखे यांनी यावेळी बोलताना दिले.

महाजन साध्या शिक्षकाचा मुलगा आज करोडोंची प्रॉपर्टी….; खडसेंचा गंभीर आरोप

Tags

follow us