महाजन साध्या शिक्षकाचा मुलगा आज करोडोंची प्रॉपर्टी….; खडसेंचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
महाजन साध्या शिक्षकाचा मुलगा आज करोडोंची प्रॉपर्टी….; खडसेंचा गंभीर आरोप

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) डोक्यावर उपचार करावे लागतील, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार करू, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीका केली होती. या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे, इतका मी आर्थिक दुर्बल नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा नांदेडच्या दुर्घटनेची जबाबदारी घ्या आणि राजीनामा द्या, अशा शब्दात खडसेंनी महाजन यांच्यावर हल्लाबोल केला.

World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी 

आज एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाजन यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे एवढा मी आर्थिक दुर्बल नाही. माझं डोक ठिकाणावर आहे, म्हणून त्यांना उत्तर देतो. माझं डोकं ठिकाणावर नसतं तर गिरीश महाजन यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, मी एका जमीनदाराचा मुलगा आहे. मी माझ्यावर उपचार करण्यासाठी सक्षम आहे. महाजन हे एक साध्या शिक्षकाचा मुलगा आहेत. आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसले आहेत. महाजन यांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात शासकीय रुग्णालयात शेकडो लोक मरताहेत, त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. नांदेडच्या घटनेला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात. नुसते एकनाथ खडसेंवर टोलवाटोलवी करून चालणार नाही, अशा शब्दात खडसेंनी महाजन यांना फटकारलं.

खसडे यांनी काल भोसरी एमआयडीसी भुखंडात कोर्टाने जामीन दिला. यावर बोलतांना ते म्हणाले की, कोर्टाने भोसरी प्रकरणात माझ्या पत्नीला कायमचा जामीन दिला. नाथाभाऊ जेलमध्ये गेले पाहिजेत, असं गिरीश महाजांना वाटतं. सरकारमधील अनेक नेत्यांना-मंत्र्यांना तसंच वाटतं. त्यासाठी हे लोक सतत काहीतरी उपदव्याप करत असतात. अनेक चौकशा माझ्या मागे लावल्या. दाऊतच्या बायकोशी माझे संबंध आहेत, असे आरोप माझ्यावर करण्यात आले. मात्र, त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही. मुळात त्यांच्या आरोप तथ्यचं नव्हतं, असं खससे म्हणाले.

खडसे म्हणाले, अजूनही राज्यातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिल्यापेक्षा मला अडचणीत आणण्याला प्राधान्य दिलं जातं. मला अटक करण्याच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. या बातम्यांमधून असूरी आनंद विरोधकांना होत होता. मात्र, या बातम्या मी मनोजरंन म्हणून पाहिलं. कारण, मला न्यायदेवतेवर विश्वास होता, असं खडसे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube