Ahmednagar : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेव्हा मला वाटलं की विखे पाटील हे भाजपात काम करतील की नाही, पण आज ते भाजपात आहेत. आज मला अभिमान आहे की ते आमचे नेते असून सहकारमध्ये अनुभवी नेते आमच्या सरकारमध्ये आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
INDIA आघाडी अजेंडालेस, मोदींना मनातून काढू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांचेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडला.
पंतप्रधानपदासाठी भाजपाकडे दुसरा चेहरा कोण? ठाकरेंच्या प्रश्नावर शिंदेंचं सडेतोड उत्तर
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप व इतर मान्यवर यांच्यासोबत या सोहळ्यास उपस्थित राहिलो.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर देखील कौतुकाचे फुले उधळली. बावनकुळे म्हणाले, आज मला कौतुक वाटत की मोदींच्या नऊ वर्षातील कामे आपल्या लोकसभेत यशस्वीपणे मांडण्याचे काम सुजय विखे यांनी केले आहे. मला अभिमान वाटतो की विखे पिता पुत्राकडून जिल्ह्यात खूप चांगली विकासकामे सुरु आहे.
आज महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तवेढ विखे कुटुंबीयांनी रोवली. आज महाराष्ट्रात शासन आपल्या दारी या योजनेमध्ये अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य आज लाभत आहे. तसेच या योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देखील लाभला आहे.