पंतप्रधानपदासाठी भाजपाकडे दुसरा चेहरा कोण? ठाकरेंच्या प्रश्नावर शिंदेंचं सडेतोड उत्तर

पंतप्रधानपदासाठी भाजपाकडे दुसरा चेहरा कोण? ठाकरेंच्या प्रश्नावर शिंदेंचं सडेतोड उत्तर

पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत केला होता. दरम्यान, ठाकरेंच्या याच प्रश्नाला मुख्यमंती एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत त्यांना शाब्दिक टोला लगावला आहे. अनेक चेहरे कोणाला असतात? हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात, तिकडे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत, असं प्रत्त्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Rakhi Sawant: उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “फातिमा नाही तर…”

प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांचेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप व इतर मान्यवर यांच्यासोबत या सोहळ्यास उपस्थित राहिलो.

local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. दरम्यान नुकतीच इंडिया आघाडीची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत बोलताना ‘आमच्याकडे पंतप्रधान बनण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भाजपकडे मोदी सोडून काय पर्याय आहे?’ असा सवाल ठाकरे यांनी केला. कर्नाटकमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले. त्यांना बजरंग बलीला आणावं लागलं. पण देवानेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.’अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

‘सामना’च्या टीकेवर ठाकरेंसमोरचं शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुम्ही तुमचं काम…’

ठाकरेंच्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, काहीजण म्हणाले, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. मात्र अनेक तोंड कुणाला असतात? हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मुंबईत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. कशाला आलेत? तर पंतप्रधान मोदींशी कसं लढावं यावर चर्चा करायला ते एकत्र आले. मात्र मी त्यांना सांगेन, आग से मत खेलो, नहीं तो आपके हात जल जाएंगे! आज एका माणसाच्या विरोधात एवढे चेहरे एकत्र आले आहे की त्यांच्या बॅनरवर त्यांच्या नेत्यांचे चेहरे देखील दिसत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube