‘सामना’च्या टीकेवर ठाकरेंसमोरचं शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुम्ही तुमचं काम…’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका-टीप्पणी केली जात असल्याचं दिसून आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपलं मौन सोडलं असून माध्यमांनी टीका केली म्हणून आम्ही आमचं थांबवायचं का? तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंसमोरच(Udhav Thackeray) शरद पवारांनी हे विधान केलं आहे.’इंडिया’ आघाडी परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Pune : मोहोळ, मुळीक यांची झोप उडणार? PM मोदींचा विजय सोपा केलेल्या नेता लोकसभेला इच्छुक
राष्ट्रवादीतला मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सामिल झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती, राष्ट्रवादीचे 40 आमदार म्हणजे पक्ष नसल्याचं ते म्हणाले होते. मात्र, त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याचंही समोर आलं होतं. पुण्यातील एका उद्योजकाच्या निवासस्थानी ही गुप्तभेट झाल्याचं समोर आलं होतं.
आशिया चषकात शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सचिन तेंडुलकर नंबर वन
शरद पवार-अजित पवार भेटीनंतर राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, माध्यमांनी काही शरद पवार आणि अजित पवार यांची पाठ न सोडल्याचं दिसून आलं होतं. या गुप्तभेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रामधून अजित पवारांसह शरद पवारांवरही टीका करण्यात आली होती.
नगरमध्ये मध्यरात्री प्रवाशांवर दरोडा, पळून गेलेले 3 दरोडेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद
महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही. दोन पवारांची ‘गंमतभेट’ आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही असे म्हणत शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीवर सामनातून हल्लबोल करण्यात आला. पवार काका-पुतण्यांची भेट हा साथीचा आजार आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विक्षांतीसाठी साताऱ्यात जातात हा मानसिक आजार असल्याचीही टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली होती.
एकूणच या संपूर्ण घडामोडीनंतर सामनाच्या अग्रलेखात केलेल्या टीकेवरुन शरद पवारांनी माध्यमांना सल्लाही दिला आहे. बोलताना शरद पवार म्हणाले, तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो, असा सल्लाच पवारांनी माध्यमांना दिला आहे.