local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

local body election  : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

local body election : राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे (local body election ) भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किंग खानचा जबरदस्त डान्स! Video Viral

22 सप्टेंबरला होण्याची सुनावणी शक्यता…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात होणाऱ्या सुनावणीची दिर्घ प्रतिक्षा कायम आहे. कारण उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. तर कोणत्याही कारणाशिवाय ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. या एका सुनावणीवर पुणे मुंबईसह राज्यातील आणि देशातील अनेक महानगरपालिकांच्या नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदांच्या निवडणुका अवलंबून आहेत. तर गेल्या वर्षभरापासून ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे.

Sachin Tendulkar च्या घराबाहेर ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी आंदोलन; बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

त्याचबरोबर कोणत्याही कारणाशिवाय ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. शेवटची सुनावणी ही 22 जुलैला होणार होती. त्यावेळी देखील ही सुनावणी लांबणीर पडली होती. त्यानंतर उद्या 1 सप्टेंबर ही लारीख या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या वर्षी 22 ऑगस्टला या प्रकरणाव शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर तब्बल एक वर्ष झालं तरी या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रशासक नेमलेले आहेत. तर लोकशाहीमध्ये अशा प्रकारे दिर्घकाळ प्रशासक नेमलेले असणे हे आपेक्षित नाही. तरी देखील यावर नेमकं काय राजकारण सुरू आहे. यावर चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube