Download App

श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…; नागरिकांचा आक्रमक पवित्रा

Srirampur Movement : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने शिर्डी (Shirdi)येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (Upper Collector’s Office)होणार असे जाहीर केले. त्यांनतर श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा (Srirampur District)झाला पाहिजे यासाठी शहरात घंटानाद आंदोलन (Bell movement)सुरु आहे. श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्ते देत आहे. तसेच जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र श्रीरामपूर जिल्हा करावा तसेच शिर्डी येथे मंजूर करण्यात आलेले अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. (ahmednagar-citizens-aggressive-for-srirampur-district-movement)

Prithvi Shaw Controversy : मुंबई पोलिसांकडून पृथ्वी शॉला क्लिनचीट; सपनाचे सर्व आरोप खोटे

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला नगर जिल्ह्याचे विभाजन केले जावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी अनेकदा राजकीय आंदोलनं देखील झाली. मात्र जिल्ह्याचे मुख्य केंद्र कोणते असेल यावरून राजकीय भेद हा सुरु होता. आजी-माजी मंत्र्यांचे आपलाच तालुका हा मुख्य केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न सुरु होते. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच होता. मात्र पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरू लागली आहे.

Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा

एकीकडे हे सुरु असताना काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार असा आदेश शासन दरबारातून निघाला. शासनाच्या आदेशावर श्रीरामपूर करांनी मोठी नाराजी दर्शवली. गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवे मुख्यालय करण्याची मागणी ही केली जात आहे. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्‍यक सर्व सरकारी कार्यालय येथे कार्यरत आहेत. यामुळे श्रीरामपूर हाच जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर जिल्हा व्हावा तसेच शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार हा निर्णय मागे घेण्यात यावा यामागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, आता पुन्हा एकदा श्रीरामपूरकर एकवटले आहेत. श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us