Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा

Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा

Nitesh Rane on Sanjay Raut : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांना आपल्या मंत्रिमंडळासह, आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेतलं. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘बीआरएस ही बीजेपीची बी टीम आहे. असं ते म्हणतात मात्र स्वतः संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे.’ असं म्हणत खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ( Nitesh Rane criticize Sanjay Raut on KCR in Pandharpur )

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले की, ‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेतलं. हे संजय राऊत आणि त्यांच्या मित्र पक्षांना फार झोंबतय. बीआरएस ही बीजेपीची बी टीम आहे. असं ते म्हणतात मात्र स्वतः संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे. तर त्यांचा उबाठा लवकरच राष्ट्रवादीमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने लोकांना बी किंवा सी टीम म्हणता.’

Prithvi Shaw Controversy : मुंबई पोलिसांकडून पृथ्वी शॉला क्लिनचीट; सपनाचे सर्व आरोप खोटे

तसेच ते पुढे म्हणाले की, देशात लोकशाही आहे. कोणीही कुठेही जाऊन मतं मागू शकतं. तसेच हे लोक एकीकडे संविधान बचाव म्हणायचं आणि दुसरीकडे हुकुमशाहीसारखं वागता. उबाठा देखील भाजपसोबत युती असताना अनेकदा परराज्यात निवडणुका लढवत होते. पण तुमचे डिपॉझिट जप्त होत होते. तेव्हा तुम्हाला कोणी ही विचारलं नाही. की, कशाला जाता परराज्यात? तर आता दुसऱ्यांना प्रश्न विचारू नका. अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Diwali Holiday : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! अमेरिकेतही मिळणार दिवाळीची सुट्टी

त्याचबरोबर त्यांनी यावेळी शिवसेना उबाठा गटाचं कार्यालय तोडलं त्यावरून देखील ठाकरे आणि राऊतांवर टीका केली की, कंगणा रनौत, राणा दाम्पत्य, आमचं राणेंच घर तोडण्यासाठी ही प्रयत्न करायचे तेव्हा सगळे आदेश वर्षावरून यायचे. त्यामुळे तुम्ही शाखा तोडल्यावर भाजप-शिंदेंना नीच म्हणण्यापेक्षा तुम्हीच नीच आहात असं टीकास्त्र राणेंनी यावेळी सोडलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube