Ahmednagar Crime : पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्याच अंगावर गाडी घालण्याच्या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे.
‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले दुष्काळाचे संकेत; शासन लागले तयारीला
नेमकं काय घडलं?
पोलिस कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. त्याचवेळी पोलिस कर्मचारी श्रीगोंदा-कर्जत रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडजवळ कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांबद्दल माहिती घेत होते. याचदरम्यान चारही आरोपी या ठिकाणी आले.
आयटीआर सबमिट केल्यानंतर पडताळणी आवश्यक, अन्यथा तुमचा रिटर्न ठरेल अवैध
आरोपींकडे असलेली कार पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीतून उतरुन पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत दमदाटी केली. पोलिसांनाच दमदाटी करण्यासाठी आलेल्या चार जणांनी शासकीय वाहनाला धडक देऊन वाहनाचं मोठ्या प्रमाणात नूकसान केलं आहे.
या घटनेतील आरोपी अतीक गुलामहुसेन कुरेशी, रा.कुरेशी गल्ली,श्रीगोंदा,ता. श्रीगोंदा, नदीम महम्मद कुरेशी, रा.श्रीगोंदा,ता. श्रीगोंदा, ओंकार दशरथ सायकर रा.राहु,ता.दौंड,जि. पुणे, समद कादरजी कुरेशी रा.करमाळा,ता. करमाळा,जि.सोलापुर यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील आरोपी नामे अतीक गुलाम हुसेन कुरेशी,(रा. कुरेशी गल्ली, ता.श्रीगोंदा) यास हद्दपार करण्यात आले आहे. मात्र तो जिल्ह्यात आढळून आला.
दरम्यान, दादराम मस्के यांच्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.