नार्वेकर CM शिंदेंचेही फेव्हरेट; तिरुपती देवस्थान ट्रस्टवर पुन्हा वर्णी : फडणीवासांच्या विश्वासू नेत्यालाही संधी

नार्वेकर CM शिंदेंचेही फेव्हरेट; तिरुपती देवस्थान ट्रस्टवर पुन्हा वर्णी : फडणीवासांच्या विश्वासू नेत्यालाही संधी

मुंबई : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळ सदस्यपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल काळे यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. नव्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतीच यादी जाहीर करण्यात आली आहे. (Shiv Sena secretary Milind Narvekar and MCC Chairman Amol kale is appointed as a member of the Tirumala Tirupati Devasthan)

28 सदस्यीय तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळ सदस्य नियुक्ती करण्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री दर दोन वर्षांनी एका व्यक्तीची आंध्र प्रदेश सरकारला शिफारस करतात. 2018 मध्ये, भाजपचे नेते आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. 2021 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आता यंदा मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे यांची विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवराज सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारः दोन महिन्यांसाठी तीन मंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री नावांची शिफारस करत असल्याने नार्वेकर यांची नियुक्ती झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. अशात नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यानंतरही त्यांच्या नावाची शिफारस झाल्याने नार्वेकर मुख्यमंत्री शिंदे यांचेही फेवरेट असल्याचे दिसून येत आहे. तक अमोल काळे यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागल्याने महाराष्ट्रातील दोन व्यक्तींची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

Chandrayaan : ’23 ऑगस्ट’ राष्ट्रीय अंतराळ दिवस; PM मोदींनी केली मोठी घोषणा

महाराष्ट्रात उभे राहत आहे तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती :

दरम्यान, देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत मंदीर ट्रस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती आता मुंबईत होत आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी तत्कालिन ठाकरे सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानला जागा भाडेतत्वार दिली होती. यावर्षी जून महिन्यात या कामाचे भूमिपूजन झाले असून सध्या या मंदीराचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारने 2019 मध्येही ट्रस्टला वांद्रे येथे 650 चौरस मीटरचा भूखंड दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube