शिवराज सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारः दोन महिन्यांसाठी तीन मंत्री
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्तेत परतण्यासाठी शिवराज सरकार (ShivrajSingh Chavan) जनतेला आणि पक्षांच्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवराज सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet expansion) झाला, त्यात 3 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल मंगूभाई पटेल (Governor Mangubhai Patel) यांनी शपथ दिलेल्या आमदारांमध्ये गौरीशंकर बिसेन, राजेंद्र शुक्ला आणि राहुल लोधी यांचा समावेश आहेत.
कोण आहेत शिवराज सरकारमध्ये झालेले मंत्री?
खरे तर शिवराज सरकारमध्ये ज्या आमदारांना मंत्री करण्यात आले त्यात सर्वात ज्येष्ठ नेते गौरीशंकर बिसेन हे बालाघाटचे आमदार आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारमध्ये यापूर्वी मंत्री राहिलेले राजेंद्र शुक्ला हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जे रेवाचे आमदार आहेत. आणि तिसरे मंत्री राहुल लोधी जे माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचे पुतणे आहेत आणि बुंदेलखंडचे आहेत, ते टिकमगड जिल्ह्यातील खरगापूरचे आमदार आहेत.
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं राष्ट्रीय पुरस्काराबद्दलचं ‘ते’ ट्वीट चर्चेत
शिवराज सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या 33
शिवराज सरकारमध्ये आता एकूण मंत्र्यांची संख्या 33 झाली आहे. यापूर्वी मध्य प्रदेश मंत्रिमंडळात 23 कॅबिनेट मंत्री होते, ज्यामध्ये 7 राज्यमंत्री होते. मध्य प्रदेश मंत्रिमंडळात मंत्र्यांची पदे रिक्त होती, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
Sharad Pawar : अजितदादांच्या पाठिंब्यानंतरही भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार
त्याचबरोबर असंतुष्टांना शांत करण्यासाठी सीएम शिवराज यांची ही कसरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नेते बंडखोरी करू शकतात, असे मानले जात होते. त्यामुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. या यादीत अनेक नेत्यांची नावे चर्चेत असली तरी. मात्र अखेर त्यांच्या नावावरच एकमत झाले.