Sharad Pawar : अजितदादांच्या पाठिंब्यानंतरही भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार

Sharad Pawar : अजितदादांच्या पाठिंब्यानंतरही भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : सध्याच्या वातावरणात शरद पवार ( Sharad Pawar ) संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे. अशी टीका मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Prasad Oakच्या ‘परिनिर्वाण’ आगामी सिनेमात झळकणार गौरव मोरे; स्वतःच खुलासा करत म्हणाला…

दरम्यान अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बंड करून भापसोबत सत्तेत आले आहेत. मात्र तरी देखील भाजप नेत्यांकडून शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करणं काही संपलेलं नाही. त्यामुळे अजित पवार जारी सत्तेत सहभागी झाले तरी भाजपने शरद पवारांना एक प्रकारे टार्गेट करणं काही सोडलेलं नाही. वारंवार भाजप नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा साधला जात आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील सहभाग आहे.

‘कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला’; मुश्रीफांनी आव्हाडांना धुतलं

भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार…

सध्याच्या वातावरणात शरद पवार ( Sharad Pawar ) संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे. अशी टीका मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

त्याचबरोबर या अगोदर देखील मुनगंटीवर म्हणाले होते की, रात्री झोपेत असताना देखील ईडी म्हटलं तरी शरद पवार ( Sharad Pawar ) हे 1 किलोमीटर धावतात. त्यांनी तत्वज्ञान सांगू नये. ज्यांनी आयुष्यात केवळ आपल्या कुटुंबासाठीच राजरकारण केलं. तसेच त्यांनी उलथवून लावण्याची भाषा करू नये. त्यांनी अशी भाषा करावी ज्यांनी आपलं आयुष्य जनतेसाठी वेचलं आहे.

बावनकुळेंचा उपरोधिक टोला…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, पुण्यात अजित पवार आणि शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या भेटीवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन लोकं भेटले तर त्याला राजकीय भेट समजू नये. एका काळ असा येणार आहे की, संपूर्ण भारत देश मोदींच्या नेतृत्वात सामोरं जाणार असून शरद पवारही एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार.

कांद्याच्या प्रश्नावरून शिंदेचा पवारांना टोला…

कांद्याच्या प्रश्नावरून राजकारण पेटलेलं असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं होत की, शरद पवार ( Sharad Pawar ) हे कृषिमंत्री असताना त्यांनी कांद्यासाठी काय केले ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला होता. तर मोंदींसारखा निर्णय त्यांना घेता आले नव्हते. त्यावर कोल्हापुरातील निर्धार सभेत अध्यक्ष शरद पवार यांनी कांद्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना सुनाविताना माझ्या काळात मी कधी कांद्याच्या निर्यातीवर कर लावला नव्हता, असा टोलाही लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube