Download App

अमोल बळे हत्या प्रकरण; ऑनर किलिंग गुन्ह्यात चार आरोपींना जन्मठेप…

Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता.

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली असून सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. ऑनर किलिंग प्रकरणातून (Honor Killing Case) ही घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांचं राऊतांवर टीकास्त्र

रुपचंद बन्सी बळे, ऋषिकेश विष्णू बळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), दत्तात्रेय लक्ष्मण बळे व अनिल रघुनाथ बळे (रा. निमगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर मयूर रावसाहेब लकारे (रा. नेवासा, ता. नेवासा) व उषा रुपचंद बळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे.

शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रो टेक्लिकल पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

घटनेतील आरोपींनी सिद्धार्थनगर जवळ अमोलला बोलावून घेतले. तेथून त्याचे अपहरण केले. त्याला नगर-दौंड रस्त्यावरील एका धाब्यात जवळ नेले. तेथे मुलीला फुस लावल्याचा आरोप करत मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या अमोलला पुन्हा दिल्लीगेट परिसरात सोडून देण्यात आले. एका वाहन चालकाच्या मदतीने तो सिद्धार्थनगर येथील घरी आला. त्याच्या मित्राने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

शिक्षक बँकेची सभा बनली आखाडा; गुरुजी थेट एकमेकांच्या अंगावरच धावले

या घटनेबाबत त्याचा भाऊ भाऊसाहेब बळे याला कळविले. गंभीर मार लागल्याने अमोलची प्रकृती अधिक चिंताजनक झाली, म्हणून त्याला उपचारासाठी औरंगाबादमधील रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाऊसाहेब बळे याने औरंगाबाद येथील क्रांती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटना तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस यांनी पुराव्यांसह दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

Tamnna Bhatia च्या ‘कावला’ ची जपानच्या राजदूताला पडली भूरळ

सरकारी पक्षातर्फे 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर जप्त केलेला होता. या खटल्यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षी पुराव्यांच्या आधारे चार आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी रुपचंद बळे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व 50 हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, आरोपी दत्तात्रेय बळे, ऋषिकेश बळे व अनिल बळे यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व 40 हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास चार महिने साधी कैद तसेच अपहरणाच्या गुन्ह्यात चारही आरोपींना सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 15 हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगावी लागणार आहे.

Tags

follow us