Tamnna Bhatia च्या ‘कावला’ ची जपानच्या राजदूताला पडली भूरळ

Tamanna

Tamnna Bhatia Japan ambassador : रजनीकांतच्या जेलर चित्रपटामध्ये असणारं अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं ‘कावला’ गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ट्रेंडिंग आहे. त्यात आता थेट जपानच्या राजदूताला देखील तमन्नाच्या या कावला या गाण्याची भूरळ पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ratan Tata Award Photo : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

तमन्ना भाटियाचे ‘कावलाट गाणं आणि त्याचा उत्साह, सीमा, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलिकडची आहे. हे सिद्ध झालं आहे. 137 मिलीयनहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाखांहून अधिक रील्सने या गाण्याने जगाला वेड लावलं आहे. अलीकडेच रील वॅगनमध्ये सामील होण्यासाठी जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यात सामील झाले. ज्यांच्या रीलच्या चर्चा सोशल मीडियावर होत असून हा व्हिडिओ ट्रेंड झाला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते ‘कावला’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

या राजदूताची ऊर्जा आणि डान्स तमन्ना भाटियाच्या “कावला” या गाण्याच्या बीट्सशी उत्तम प्रकारे जमून आली आहे. त्यानंतर हे गाणं हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आलं. त्याचं हिंदी व्हर्जन हे ‘तू आ दिलबरा’ असं आहे. या गाण्यासह रजनीकांतच्या जेलरने देखील प्रेक्षकांना सध्या भूरळ घातली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

‘मी सैतान आहे…’; इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या

थलैवा’ रजनीकांतसोबतचा तमन्नाचा तामिळ चित्रपट जेलर, मेगास्टार चिरंजीवी भोला शंकर, तमन्ना भाटिया यांच्यासोबतचा तेलगू चित्रपट, तमन्ना भाटिया या चित्रपटाच्या यशाने उंच भरारी घेत आहे. ती लवकरच डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार्‍या आखरी सच या आकर्षक हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मनोरंजक चित्रपटांची मल्याळममध्ये बांद्रा, तमिळमध्ये अरनामनाई 4 आणि जॉन अब्राहमसह हिंदीमध्ये वेदा मध्ये ती दिसणार आहे.

Tags

follow us