‘मी सैतान आहे…’; इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या

‘मी सैतान आहे…’; इंग्लंडमध्ये 33 वर्षीय नर्सने केली 7 नवजात बालकांची क्रुरपणे हत्या

Lucy Letby :  इंग्लंडमध्ये सात नवजात बालकांची निर्घृणपणे हत्या (Infanticide) केल्याप्रकरणी एका नर्सला अटक करण्यात आली आहे. तिने आणखी सहा निष्पाप बाळांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आलं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लुसी लेटबी (Lucy Letby) असं या नर्सच नाव आहे. पोलिसांनी तिच्या घरी तपास केला असता मी सैतान आहे, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढऴून आली.

इंग्लंडमधील काउंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ब्रिटीश नर्स लुसी लेटबीने 2015 ते 2016 दरम्यान 13 नवजात अर्भकांना मारण्याचा प्रयत्न केला. तिने 7 नवजात मुलांवर गुप्तपणे हल्ला केला. कधी पोटात हवा भरून, कधी अति दूध पाजून, कधी इन्सुलिनचे विष देऊन तिने त्यांना ठार केलं. या प्रकरणी लुसी लेटबीला अटक झाली. तिच्या अटकेमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर रवी जयराम यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळंच लुसीला अटक करून दोषी ठरवण्यात आलं.

मँचेस्टर क्राउन कोर्टाच्या निर्णयानंतर रवी जयराम यांनी सांगितलं की, मला वाटतं तिने ज्या मुलांना ठार केलं, ती जर जिवंत असती तर आज शाळेत जायला लागली असती. तीन मुलांचा मृत्यू झाल्याने आमची चिंता वाढली होती. त्यावेळी आमच्याकडे काही जणांना लुसीबाबत संशय व्यक्त केला होता, असं त्यांनी सांगिलंत. 2017 मध्ये, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्टने आम्हा डॉक्टरांना एका पोलिस अधिकाऱ्याला भेटण्याची परवानगी दिली. 10 मिनिटे आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला असे वाटले की या प्रकरणात लुसी लेटबीचा सहभाग असू शकतो. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि लुसी लेटबीला अटक करण्यात आली.

Khupte Tithe Gupte: सुबोध भावेच्या उत्तरानं लक्ष वेधलं, म्हणाला.. ‘राहुल गांधींची भूमिका करायला…’ 

2015 आणि 2016 दरम्यान, लुसीने नवजात युनिटमधील 13 बाळांवर गुप्तपणे हल्ला केला. लुसीने मुलांच्या शरीरात रक्ताऐवजी हवा सोडण्यासाठी नॅसोगॅस्ट्रिक ट्यूबचा वापर केला. नवजात बालकांना असह्य होईल अशा गोष्टी ती मुद्दाम करत असे. तिने या बाळांचा जीव घेतला आणि आपल्या सहकाऱ्यांसमोर नवजात बालकांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची बतावणी केली, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं.

या हत्येप्रकरणी तिला तीन वेळा अरेस्ट करण्यता आली होती. 2020 मध्ये त्याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. तिच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा तिने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत तिने हत्येची कबूली दिली. मला या बालकांची काळजी घेता येत नाही. त्यामुळं त्यांना ठार केलं. मी दुष्ट आहे, मला जगायचा अधिकार नाही, मी खरोखर सैतान आहे, असं तिने एका नोटमध्ये लिहिलं. दरम्यान, या प्रकरणी तिला शुक्रवारी कोर्टाने दोषी ठरवलं असून, आता 21 ऑगस्ट रोजी तिला शिक्षा सुनावण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube