Ratan Tata Award Photo : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टाटा समुहाचे मालक उद्योगपती रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटा यांच्या कुलाबा निवासस्थानी महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक गौरविले.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. पहिल्यांदाच हा पुरस्कार रतन टाटा यांना देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यांनी तो स्विकारला त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांचं प्रत्येक क्षेत्रात योगदान आहे. टाटा म्हणजे विश्वास लोकांच्या मनात तो विश्वास त्यांच्याबद्दल आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
