Download App

Ahmednagar :चालकाचे नियंत्रण सुटले, डंपर थेट पुलाच्या खाली

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण  डंपर थेट पुलाच्या खाली पडला या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच डंपर संपूर्ण नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवार दिनांक 31 मे रोजी दुपारच्या सुमारास घडला. या अपघाताची बातमी कळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटना स्थळी पोहचले.

Ahmednagar Name Change : आता अहिल्यादेवी होळकर नगर! CM शिंदेंची थेट घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा डंपर अहमदनगर वरून पुण्याच्या दिशेने चालला होता. यामध्ये चालक एकटाच होता. नेमका पुलावरती डंपर घेल्याच्या नंतर चालकाचे डंपर वरील नियंत्रण सुटले आणि डंपर पुलाचे कठडे ताडून खाली पडला. हा डंपर आणि चालक बाबत अधिक माहिती अजून मिळलेली नाही.

यापूर्वी देखील येथे असेच अनेक अपघात झालेले आहेत. अपघात होण्याचे कारण म्हणजे अहमदनगर – पुणे हा महामार्ग चौपदरी आहे. परंतु पुलावर हा महामार्ग दुपदरी होतो त्यामुळे पुलाव वाहनांची गर्दी होते. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात.

Tags

follow us