Ahmednagar : के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आला. आता मात्र नेमके संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वीच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात नुकतीच लष्करी अधिकारी व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक होऊन त्यावर प्राथमिक चर्चा झाली. के.के. रेंज या युद्ध सराव क्षेत्राच्या विस्तारासाठी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील 23 गावांमधील तब्बल 42 हजार 225 एकर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव संरक्षण खात्याने 28 जानेवारी 2023 रोजी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. स्थगिती मिळालेल्या हा विषय पुन्हा एकदा उपस्थित झाल्याने आता यावरुन राजकारण तापल्याचे समोर आले आहे.
‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं
महत्वाची बैठक पार पडली
के.के. रेंजसंदर्भातील भूसंपादनाबाबत नुकतीच एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधीर पाटील, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह लष्करातील अधिकारी उपस्थित होते.
पोलिस दिसताच चौघांनी थेट अंगावरच गाडी घातली, जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची घटना
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
लष्काराच्या के.के. रेंजच्या विस्तारासाठी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील 23 गावांमधील तब्बल 42 हजार 225 एकर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव संरक्षण खात्याने 28 जानेवारी 2023 रोजी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता.
दोन वर्षांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा विस्ताराचा मुद्दा थांबविला होता. तसेच या भूसंपादनबाबत आमदार निलेश लंके यांनी देखील प्रखर विरोध दर्शविला आहे.
लष्कराकडून आलेल्या प्रस्तावात सुमारे 42 हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यात शासकीय व वन विभागाचीही जमीन असल्याने हा प्रस्ताव मार्गदर्शन व मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
लष्कराने पाथर्डी रस्त्यावर कापूरवाडीकडे रणगाडे जाण्यासाठी 14 हजार 497 चौरस मीटर जमीन संपादनाचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा ऐरणीवर का आला? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.