Ahmednagar Municipal Corporation Employees Long March : अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी (ahmednagar municipal corporation employees )आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई (Mumbai)येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी (दि.4) सकाळी निघाले होते. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)यांनी लॉन्गमार्चमध्ये निघालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांची भाळवणीमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी शासन दरबारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात झालेल्या बैठकीची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये (ahmednagar municipal corporation employees long march)आरोग्य विभाग अग्निशामक विभाग आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. हा लाँग मार्च नगरवरून निघून भाळवणीपर्यंत पोहचला होता. लाँग मार्चचा आजचा तिसरा दिवस होता.
Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं
एकीकडे लाँग मार्च सुरू होता तर दुसरीकडे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे मुंबईमध्ये ठाण मांडून होते. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नगर शहरामध्ये ठप्प झालेले महानगरपालिकेचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठका घेतल्या.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ((ahmednagar municipal corporation employees long march))मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आज बुधवारी सकाळी आमदार संग्राम जगताप यांनी लॉन्ग मार्चसाठी निघालेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची भाळवणी येथे जाऊन भेट घेतली. मुंबई झालेल्या सर्व घटनाक्रमाबाबत सविस्तर माहिती देत सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले लेखी पत्र घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका कर्मचारी युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या कडे देण्यात आले. या पत्रात 10 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समावेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीबाबत तसेच सफाई कामगार यांच्या वारसहक्काच्या मागणीबाबत आणि महानगरपालिका आस्थापनावरील अधिकारी/कर्मचारी व सफाई कामगार यांचा आकृतीबंध मंजूर असताना कोणतीही भरती अद्यापपर्यंत झाली नसल्याबाबत ही बैठक घेण्याचे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी आपला लॉंग मार्च मागे घेतला. त्यामुळे आता उद्यापासून महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत होणार आहे.
मुंबई येथे होणाऱ्या बैठकीला अहमदनगर महानगरपालिकेचे कामगार युनियनचे पदाधिकारी तसेच अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, वित्त विभागाचे मुख्य सचिव सामान्य प्रशासनाचे मुख्य सचिव नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, नियोजन विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत ही बैठक मुंबई येथे पार पडणार आहे.