Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं

Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली.  तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अजित पवार यांच्यात धुसफूस सुरू होती त्या पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Bacchu Kadu : ‘मला भाजपाचा खूप त्रास’; बच्चू कडूंच्या आरोपाने वादाची ठिणगी

दरम्यान, काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाच्या दौऱ्यातही अजितदादा (Ajit Pawar) दिसले नाहीत. ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  मात्र, अजित पवार आजारी असल्याचे छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर अजितदादांचं हे आजारपण राजकीय असल्याचंही बोललं जात होतं. अखेर त्यांचं हे राजकीय आजारपण पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर बरं झाल्याचं बोललं जात आहे.

 

चंद्रकांतदादा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री

राज्य सरकारने आज बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची सुधारीत यादी जाहीर केली. यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपविण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सध्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावती जिल्हा त्यांच्याचकडे दिला आहे. सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी आहे नव्या पालकमंत्र्यांची यादी

पुणे – अजित पवार

सोलापूर – चंद्रकांत पाटील

अकोला – राधाकृष्ण विखे पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज