Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेची मुदत (Ahmednagar) बुधवार (ता. २७) रोजी संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा किंवा बैठका घेता येणार नाहीत, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून नुकतेच जारी करण्यात आले. या निर्णयानंतर महापालिकेत प्रशासकराज सुरू होईल. नगर महापालिकेची मुदत 27 डिसेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करत महापालिका प्रशासनाने पत्र प्रसिद्ध केले.
अहमदनगर महापालिकेची मुदत 27 डिसेंबर रोजी संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रशासक नेमणूक करण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सभा आणि बैठका घेता येणार नाहीत असे प्रशासनाने पत्रात म्हटले आहे.
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप टळणार? बैठकीकडे राज्याचे लक्ष
प्रशासक कोण, अद्याप सस्पेन्स कायम
महापालिकेत प्रशासक म्हणून कोण येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात याआधी जिल्हा परिषद असो किंवा महापालिका मुदत संपल्यानंतर तेथे कार्यरत आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र असे असले तरी नगर महापालिकेबाबत वेगळा प्रश्न उपस्थित केला जातो, त्याला कारण जसे राजकीय आहे, तसे ते प्रशासकीयही आहे. महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कुणाची नियुक्ती झाली याबाबत अद्यापही नगरविकास खात्याकडून माहिती प्राप्त झालेली नाही. अहमदनगर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त किंवा जिल्हाधिकारी अथवा जिल्हा परिषदेचे सीईओ यांची नियुक्ती प्रशासक म्हणून होऊ शकते असे सांगितले जात आहे. मात्र,याबाबत अद्यापही कोणतेही पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेले नाही.