Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप टळणार? बैठकीकडे राज्याचे लक्ष
Ahmednagar News : देशात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्हयातील (Ahmednagar News) शनी शिंगणापूर देवस्थान हे सध्या वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असताना आता या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आजपासून (25 डिसेंबर) सुरु होणारा कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कामगार युनियन आणि देवस्थान प्रशासन यांच्यात नाशिकमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही तर 26 डिसेंबरपासून कामगार पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार व संप टळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज” : विखेंची राजकीय बॅटिंग अन् थोरात ‘टार्गेट’
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या सुमारे साडेतीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवारपासून (25 डिसेंबर) हे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार होते. भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू) या कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
शैक्षणिक पात्रतेनुसार पदे दिली जावीत, पाचव्या वेतन आयोगानुसार 2003 पासून फरक दिला जावा, सातवा वेतन आयोग लागू केला जावा, कुटुंबाला वैद्यकीय उपचार मोफत द्यावेत तसेच मृत कर्मचाऱ्याच्या घरातील एकाला नोकरी द्यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा संप आहे.
नगरचे प्रसिध्द ह्युम मेमोरियल चर्च कुणी बांधलं? काय आहे चर्चचा इतिहास?
दरम्यान हा संप टाळावा व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून देखील बैठक तसेच चर्चा सुरु आहे. यातच नवं वर्ष, नाताळ सुट्ट्यांचा काळ असल्याने शनी शिंगणापूरकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या हि मोठी असते. दरम्यान याच काळात हा संप होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.
या संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून अद्यापही सुरू आहेत. देवस्थान ट्रस्टसोबत चर्चा निष्फळ ठरत असल्याने कामगारांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज होणार हा संप एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कामगार युनियन आणि देवस्थान प्रशासन यांच्यात नाशिकमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही तर 26 डिसेंबरपासून कामगार पुन्हा एकदा संपावर जाणार आहे.