“संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज” : विखेंची राजकीय बॅटिंग अन् थोरात ‘टार्गेट’

“संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज” : विखेंची राजकीय बॅटिंग अन् थोरात ‘टार्गेट’

संगमनेर : “संगमनेरला चांगल्या बॅटसमनची गरज आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. बाकी फिल्डींगचे काम तुम्ही माझ्यावर सोडा” असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना डिवचले. (Minister Radhakrishna Vikhe once again criticized former minister and Congress leader Balasaheb Thorat)

थोरात-विखे हे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यामुळे औचित्य कोणतेही असो दोघेही एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. याचीच पुनरावृत्ती संगमनेर तालुक्यात बघायला मिळाली. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विखे पाटलांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी थोरातांना डिवचत जोरदार राजकीय बॅटिंग केली.

होय, माझं सगळीकडे लक्ष नव्हतं, आता नावलौकिक वाढेल असे निर्णय घ्या; पवारांचा अजितदादांना टोला

यावेळी विखे म्हणाले, या स्पर्धेतून चांगले फलंदाज आणि गोलंदाज मिळाले आहेत. याचप्रमाणे आता या तालुक्यालाही चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. बाकी फिल्डींगचे काम माझ्यावर सोडा, असेही ते म्हणाले.

आता शाळेतच शेतीही शिकविणार! पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाच्या विषयाची सुरुवात

जनार्दन आहेर यांनाही सल्ला :

यावेळी विखे पाटलांनी शिवसेना (UBT) गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांनाही राजकीय सल्ला दिला. “आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा, आयपीएलसारखे संघ बदलू नका. आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे”, असा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रणही दिले असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube