होय, माझं सगळीकडे लक्ष नव्हतं, आता नावलौकिक वाढेल असे निर्णय घ्या; पवारांचा अजितदादांना टोला

  • Written By: Published:
होय, माझं सगळीकडे लक्ष नव्हतं, आता नावलौकिक वाढेल असे निर्णय घ्या; पवारांचा अजितदादांना टोला

Sharad Pawar Press Conference : नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची  मी नेहमी काळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की, गेल्या 10 ते 15 वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. तसेच मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. मात्र, आता नवीन पिढीने पुढे येऊन जबाबदरी घेतली पाहिजे असं मला वाटतं. असे म्हणत आता तिथल्या सगळ्यांना अजितदादांनी बरोबर घ्यावं आणि नावलौकीक वाढेल असे निर्णय घ्यावे, असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) अजितदादांना लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

‘पवारांवर परिवादाचं लेबल नव्हतं’ अजितदादांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं सणसणीत उत्तर

पवार म्हणाले की, आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका. त्यांचं बरेच वर्ष ऐकलं, असं विधान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. गेल्या 10 ते 15 वर्षात मी कधीच बारातमीत कोणता निर्णय घेतला नाही. साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबादराी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही.

स्वतःच्या बंडाबाबत काय म्हणाले पवार

काल (दि.24) बारामतीत अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांनी 38 व्या वर्षी बाहेर पडत बंड करत वेगळी चुल मांडली होती. मात्र, आम्हाला असं करण्यासाठी 60 ते 62 वर्ष थांबावं लागलं आहे. त्यामुळे आता तरी आम्हाला काम करू द्यावं असं विधान केले होते. त्यावर पवारांनी आज भाष्य करत नावलौकीक वाढेल असे निर्णय घ्यावे हीच आपली इच्छा आहे असा टोला अजितदादांना लगावला आहे. तसेच वयाच्या 38 व्या आपण केलेले बंड नव्हते असा दावा पवारांनी केला आहे. आम्ही बसून निर्णय घ्यायचो आणि त्यानंतर त्यात कुठलीच तक्रार नसायाची असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

महिलांनी अमृता फडणवीसांना रोड मॉडेल मानलं पाहिजे; पुरुषोत्तम खेडेकरांचा सल्ला

अन्य प्रश्नांवर काय म्हणाले पवार

यावेळी पवारांनी देशातील अन्य प्रश्नांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, इथेनॉलचं उत्पादन वाढवावं अशी मागणी सर्वांची आहे. देशात वाहने वाढत आहेत. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवणं गरजेचे आहे.  इथेनॉलला आम्हीदेखील प्रोत्साहन दिलं. पण आत्ताच्या केंद्र सरकारच्या नितीमध्ये कमतरता असल्याचे पवार म्हणाले. याबाबात काही गोष्टी शिल्लक असून, आपण स्वतः मोदी आणि शहा यांना लोकांचं म्हणणं पाठवलं असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

अनेक सर्व्हे येतात पण निकाल वेगळा लागतो

यावेळी नुकत्याच समोर आलेल्या सी व्होटर सर्व्हेवरदेखील पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला. त्यामुळे सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.  इंडियाच्या बैठकीत मी स्वतः खर्गे यांना प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे असे सांगितल्याचेही पवार म्हणाले. कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. मात्र, याला खूप उशीर झाल्याची खंत पवारांनी यावेळी बोलून दाखवली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube