महिलांनी अमृता फडणवीसांना रोड मॉडेल मानलं पाहिजे; पुरुषोत्तम खेडेकरांचा सल्ला

  • Written By: Published:
महिलांनी अमृता फडणवीसांना रोड मॉडेल मानलं पाहिजे; पुरुषोत्तम खेडेकरांचा सल्ला

Purushottam Khedekar on Amruta Fadnavis : महिलांनी स्वत:ला बदलणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना आदर्श मानायला हवे. महिलांनी स्वतःची उंची ठरवावी, असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar ) यांनी महिलांना दिला. बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात खेडेकर बोलत होते.

Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा…पाहणी…आश्वासन, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच 

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना खेडेकर म्हणाले, बुहजन समाजात स्त्रियांच्या शिक्षणाचा स्तर वाढला हे खरं आहे. पण, महापुरुषांना अपेक्षित असलेला सामाजिक बदल तिककसा झालेला नाही. आज स्त्रिया अंतराळात पोहोचल्या, पण पीएचडी झालेल्या महिलाही चंद्रदर्शनाने उपवास सोडतात. व्रत-वैकल्य करतात. शिकल्या-सवरलेल्या महिला देखील आपल्या पोटी जन्मलेल्या लेकरातं मुलगा-मुलगी असा भेद करतात, याला काय म्हणावे? असा सवाल त्यांनी केला.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू 

खेडेकर म्हणाले, आज महिलांनी बदल करणं फार गरजेचं आहे. मी बदलले, कुटुंब बदललो तर समाजात बदल दिसेल. आणि महिलांनी आमूलाग्र बदल स्वीकारले तरच खर्‍या अर्थाने स्त्रीवाद निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्राम्हण स्त्रियांनी ज्या प्रमाणे अन्याय, अत्याचार झुगारून दिले. त्याप्रमाणे प्रत्येक महिलांनी देखील अन्यायाला बाजूला सारावं. महिलांनी स्वत:ची उंची स्वत: ठरवावी. महिला या मोठा बदल घडवू शकतात…. अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. जेव्हा फडणवीसांना केसं कापायलाही जायंच असेल ते अमृता फडणवीसांना विचारून जातात. त्याप्रमाणे महिलांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे. प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोड मॉडेल मानलं पाहिजे, असं खेडेकर म्हणाले.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मनोज जरांगे २० तारखेपासून मुंबईत उपोषण करत आहेत. जरांगेच्या मागणीला ओबीसीतून विरोध होतोय. यावरही खेडेकरांनी भाष्य केलं. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून समाजाचं फेरसर्वेक्षण करून अहवाल सकारात्मक आल्यास व जर त्यात मराठा समाज हा सामाजिक-शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे व ओबीसीस पात्र असेल तर राज्य सरकारला त्यांच्या अधिकारूनत ओबीसीतून आरक्षण द्यावं लागेल. अन्यथा मराठा समाजाला EWS शिवाय पर्याय नाही. शिवाय मराठा समाजाने ओबीसी पात्रता पूर्ण केली असल्याने मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करणे घटनात्मक आहे, असं खेडेकर म्हणाले.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube