काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

पुणे : “पाच वर्ष त्यांच्या मतदार संघात लक्ष दिले असते. पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्ष यात्रा सुचत आहे तर कोणाला पदयात्रा सुचत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका केली. तसेच तुम्ही काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार असा निर्धारही पवार यांनी बोलून दाखविला. (Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes NCP (Sharad Pawar) group MP Amol Kolhe’s farmers protest march)

खासदार कोल्हे हे 27 ते 30 डिसेंबर या दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. याबद्दल आज (25 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली.

मी साठीनंतर निर्णय घेतलाय, तुम्ही तर चाळीशीच्या आत…अजितदादांचा शरद पवारांना टोला

अजित पवार म्हणाले, “शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे, मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही.

Pune Lok Sabha 2024 : ‘ …तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार’; सुनिल देवधरांची घोषणा

“पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्षयात्रा सुचते तर कोणाला पदयात्रा सुचते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडायचा अधिकार आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच ते ढेपाळले आणि राजीनामा द्यायला लागले होते. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो, पण आता तुम्ही काळजी करु नका. शिरुरमध्ये पर्याय देणारच आणि तिथे दिलेला उमेदवार निवडणूनही आणणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube